? गुड न्यूज! आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक!

12/03/2021 3 Comments

? गुड न्यूज! आता व्हॉट्सॲपवर दिसणार इंस्टाग्रामच्या रिल्स; जाणून घ्‍या अधिक!

?जगभरातील व्हाट्सॲप युजर्ससाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. जगभरातील लोक टिकटॉक चा वापर करत असताना अचानक टिकटॉक बंद झाले, आणि त्यामुळे इंस्टाग्राम वरच्या रिल्स लोकांमध्ये धुमाकूळ घालू लागल्या.

? सध्या अनेक युजर्स या रिल्स च्या माध्यमातून विविध व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम च्या प्रोफाईलवर टाकत असतात. त्यामुळेच, आता इन्स्टाग्राम रिल्स व्हिडिओ लवकरच व्हाट्सॲपध्ये सुद्धा दिसणार आहेत.

?‍♀️ काही दिवसांमध्ये व्हाट्सॲपवर एक नवीन टॅब दिसणार आहे. ज्यावर इन्स्टाग्राम रिल्सचे शॉर्ट व्हिडिओ दिसणार आहेत.

ℹ️ एका खास रिपोर्टमधून हि माहिती समोर आली आहे. फेसबुकने व्हाट्सॲपमध्ये एक डेडिकेटेड इंस्टाग्राम रील्स टॅबची टेस्टिंग सुरू केली असून येणाऱ्या काही दिवसामध्ये याला डेव्हलप केले जाऊ शकते.

◼️या वर्षी लोकांना व्हाट्सॲपमध्ये हे फिचर मिळू शकते. व्हाट्सॲप आणि इंस्टाग्राम फेसबुकची मालकी असलेली कंपनीने नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये इंटिग्रेशन प्रोसेसवर जास्त जोर दिला आहे.

? त्याचबरोबर कोणत्याही मोठ्या कंपनीच्या एका प्लॅटफॉर्मवर एक दुसऱ्याच्या चांगले फीचर्स दिसल्यावर लोकांना पॉप्यूलिरिटी वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

▶️ व्हाट्सॲप मागील काही महिन्यांपासून अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. व्हाट्सॲपमध्ये एक खास टॅब असायला हवे ज्यामध्ये युजर्संना इंस्टाग्राम रिल्स पाहता येऊ शकतील.

✅ त्यामध्ये रिल्स बनवण्याची सुविधा दिली जाऊ शकते.असा फेसबुकचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबत अधिक सविस्तर माहिती मिळू शकते.