शेतकऱ्यांनो! ‘हे’ कागदपत्रं नसेल, तर मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा लाभ, आता काय करायचं? वाचा.. - आम्ही कास्तकार
Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो! ‘हे’ कागदपत्रं नसेल, तर मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा लाभ, आता काय करायचं? वाचा..

0 1,203

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील करोडो शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये लाभ दिला जातो. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-Kisan Samman Nidhi) नऊ हप्त्यांचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. 15 डिसेंबर 2021 पर्यंत दहावा हप्ता येणार असल्याचे सांगण्यात येतंय. आता शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना इतर कागदपत्रांसह एक महत्त्वाचं कागदपत्र द्यावं लागणार आहे.

सरकारने पंतप्रधान किसान योजनेत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी नवीन नोंदणीसाठी रेशन कार्ड (शिधापत्रिका) सादर करणे आवश्यक केले आहे. यासोबतच रेशनकार्डची सॉफ्ट कॉपीही पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. जर तुम्ही पीएम किसानमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) नंबर वेबसाईटवर अपलोड करावा लागेल.

मग तपासानंतरच पती, पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे. यासोबतच कार्डची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागणार आहे. त्याच वेळी, या योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबरपर्यंत जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करावी लागणार आहे.

हे पण वाचा -
1 of 513

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सुरुवातीस ज्यांच्याजवळ 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती होती, तेच शेतकरी पात्र मानले जात होते. पण आता केंद्र सरकारने ही सक्ती काढून टाकून शिथिलता आणली आहे. जेणेकरून 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. तसेच, सरकारने लाभार्थ्यांना आधार कार्ड (aadhaar card) सक्तीचं केलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे आधार आहे त्यांनाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं आहे.

घरबसल्या करा नोंदणी…

जर तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तुम्ही https://www.pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नरवर जा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. आता तुम्ही ‘न्यु फार्मर्स रजिस्ट्रेशन’ वर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता.

प्राप्त माहीतीनुसार, आता या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील जोडण्यात आले आहे. पीएम किसान योजनेचे लाभार्थी सहजपणे KCC बनवू शकतात. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्जही मिळणार असल्याचं समजतंय. तसेच, पीएम किसान मानधन योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. या योजनेच्या अंतर्गत, देशातील शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.