पीएम किसान PM Kisan योजनेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेत सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.2019 मध्ये ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. सरकार ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते .
सरकारद्वारे आताच PM Kisan पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 9व्या हप्त्याची रक्कम जमा केली गेली आहे. PM Kisan पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 9हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. आता यापुढील 10वा हप्ता कधी जमा होणार आहे हे बघूया
पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. तर यानुसार PM Kisan पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना PM Kisan पी एम किसान योजनेची रक्कम त्यांनी आपली नोंदणी रेकॉर्ड दुरुस्त करून घावे जेणेकरून त्यांना 10वा हप्ताची रक्कम मिळेल